शरद पवारांच्या कथित जात प्रमाणपत्रावर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

बारामती, 13 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कथित जातीचे प्रमाणपत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे यावरून सध्या आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार यांच्याशी संबंधित व्हायरल होत असलेले हे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

ओबीसी: दे धक्का कुणबी!

शरद पवार यांच्याशी संबंधित एक बनावट ओबीसी जात प्रमाणपत्र व्हायरल होत आहे. मराठा आरक्षणाच्या वादात शरद पवार हे ओबीसी जातीतील असल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, “आजकाल अशी बनावट प्रमाणपत्रे व्हायरल होत आहेत. शरद पवार यांच्याशी संबंधित हे जात प्रमाणपत्र पूर्णपणे बनावट आहे. शरद पवार शाळेत असताना मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखलाही इंग्रजीत छापला गेला होता का? याबाबत शंका आहे. हा कोणाचा तरी बालिशपणा असून, आजकाल बनावट प्रमाणपत्रे बाजारात सहजपणे उपलब्ध होत आहेत.”

त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या प्रकृतिविषयी माहिती दिली आहे. “शरद पवार यांना गेल्या शनिवारपासून अस्वस्थपणा वाटत होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. तसेच डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे. मला वाटते की, लोकांच्या प्रार्थना आणि प्रेमामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे”, अशा सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

अग्नीशामक घोटाळा!

तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या पवारांच्या कौटुंबिक दिवाळी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. यासंदर्भात देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये राजकीय मतभेद आहेत. मात्र, त्याचवेळी आमच्या कुटुंबात कसलेही मतभेद नाहीत”, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले आहे.

One Comment on “शरद पवारांच्या कथित जात प्रमाणपत्रावर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *