अग्नीशामक घोटाळा!

अभ्याः काय संभ्या, आज नगरपालिकेत?
संभ्याः होय! आज नगरपालिकेत आलोय.
अभ्याः तुमचं ग्रामीणच्या लोकांचं बारामतीच्या नगरपालिकेत काय काम?
संभ्याः म्हंजी काय, आम्ही येऊ न्हाय काय?
अभ्याः तू कुठला सुप्याचा अन् नगरपालिकेत नेमकं काय काम काढलं?
संभ्याः काय न्हाय, आलोय आग्नीशामक विभागात.
अभ्याः कुणाच्या इमारतीचं आग्नीशामक परवाना काढत्योय?
संभ्याः काय न्हाय रं, सुप्यात एक जवळच्या डॉक्टर मित्र हाय, त्यांच्या बिल्डिंगची आग्नीशामकचं ना हारकत दाखला काढायला आलोय.
अभ्याः पण बारामती नगरपालिकेचा ना हारकत दाखला सुप्याला कसं काय चालतंय?
संभ्याः अरं, तुला न्हाय कळायचं. बिल्डिंगच्या आरखाडा परवानगीला आग्नीशामकचं ना हारकत प्रमाणपत्र लागतं, अन् ते असल्याशिवाय नगर रचनाकार परवानगी देत न्हाय.
अभ्याः म्हंजी, बारामतीचं कार्यक्षेत्र नसलेल्या कार्यक्षेत्रात बारामती नगरपालिकेचा अधिकारी अधिकार नसताना, कार्यक्षेत्र नसताना फायर एनओसी देतोय?
संभ्याः हा, देतोय. त्यात काय हाय तव्हा? पैसे मोजलं की सगळं होतंय.
अभ्याः अन् त्या फायर एनओसीवर नगर रचनाकार बिल्डिंग बांधायला परवानगी देतोय?
संभ्याः हा, देतोय. नुसती परवानगी देत न्हाय, बँकेचं कर्ज प्रकरणही होतंय. नगर रचनाकाराच्या परवानगीनं बँकेचं प्रकरणही होतंय.
अभ्याः म्हंजी, फायर परवानगी डुब्लिकेट, खोटी. बांधकाम परवानगी डुब्लिकेट, खोटी. बँकेचं लोन देखील फसवूनच. म्हंग खरं हाय तरी काय?
संभ्याः पैसा!
अभ्याः खरं सांग बरं. फायर ब्रिगेडला किती पैसे देतो, नगर रचनाकारला किती पैसे देतो, बँकवाल्याला किती पैसे देतो सगळं मंजूर करायला.
संभ्याः बिझनेस सिक्रेट.
अभ्याः म्हंजी तुम्ही सगळं बेकायदेशीर करणार, ती बी आमच्या नगरपालिकेत येऊ. धन्य हाय तुझं सिक्रेट!
संभ्याः जाऊ दे बाबा, मला साहेबाला पैसे द्यायच्यात.
अभ्याः अरं मला थोडं तरी दी.
संभ्याः काम घेऊन ये. मी तुझं काम करून देतो अन् मधली दलाली पण देतो. राम.. राम.. निघतो बाबा.
अभ्याः जा बाबा, तू जा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *