सरकारने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य नाही- जरांगे पाटील

जालना, 1 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज (दि.31) स्विकारला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील ज्यांच्याकडे कुणबीची नोंद आहे. त्यांना आता कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य नसल्याचे म्हटले आहे.

धर्मांतरण करताना!

राज्य सरकारने अर्धवट प्रमाणपत्रांचे वाटप करू नये. या प्रमाणपत्रांचे वाटप आम्ही करू देणार नाही. त्यामुळे सरकारने सरसकट आरक्षण जाहीर करावे. तसेच सरकारने आज रात्री निर्णय घेऊन त्यासाठी उद्या विशेष अधिवेशन बोलवावे आणि मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. तर हा निर्णय न झाल्यास उद्यापासून पाण्याचा त्याग करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच मराठा आंदोलकांना त्रास देऊ नका, अन्यथा आपण स्वत: रस्त्यावरच धरणे धरू. मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला तर मी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करीन आणि जर मी बीडमध्ये आलो तर तुम्हाला मराठा म्हणजे काय ते कळेल, असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की, “राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर सरकारचे बारीक लक्ष आहे. कायस्वरूपी टिकणारे मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सध्या प्रयत्न करीत आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी आम्ही युद्धपातळीवर काम करत आहोत. मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे.”

एमआयडीसीतील गृहनिर्माण ते स्वःनिर्माण!

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचे पहायला मिळाला. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत सरकार अत्यंत सकारात्मक आहे. यासंदर्भात आज देखील काही निर्णय घेण्यात आले आहेत. पण काही लोक हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही आणि त्यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल”. असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना दिला आहे. पुढे ते म्हणाले की, “सरकारला अशा अनेक घटनांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. यामध्ये काहींनी जाळपोळ केली आहे. यातील काही लोकांची ओळख पटली आहे, त्यांच्यावर कलम 307 अंतर्गत कारवाई केली जाईल.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

2 Comments on “सरकारने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य नाही- जरांगे पाटील”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *