राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबई, 05 मे: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राज्यात आज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर, वरील सर्व जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबतची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो दुपारी घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://twitter.com/ddsahyadrinews/status/1786995892035199322?s=19

https://twitter.com/RMC_Mumbai/status/1787007218904150041?s=19

https://twitter.com/RMC_Mumbai/status/1786686640070545693?s=19

https://twitter.com/RMC_Mumbai/status/1786686159478784088?s=19

विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा

त्याचबरोबरच कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तविला आहे. यादरम्यान, राज्यातील अकोला येथे आज सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात आज 44.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर गोंदियात आज 22.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम

तत्पूर्वी, मे महिन्यातील पहिल्या 8 ते 11 दिवसांत महाराष्ट्र सह देशातील विविध राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे आणि बाहेर जाताना पाणी सोबतच ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या वातावरण आहे. या काळात उष्णतेपासून काळजी घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *