बारामतीत अवैध गुटखा तस्करीवर मोठी कारवाई; तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल जप्त!

बारामती, 24 मार्चः बारामती तालुक्यातील सुपे भागातील मौजे उंडवडी गावच्या हद्दीत विद्युत सबस्टेशन जवळील फार्म हाऊसमध्ये आज, रविवारी (दि. 24 मार्च) पहाटे 3.15 च्या सुमारास अवैध गुटखा साठ्यावर मोठी कारवाई करण्यात आली. सदर पोलीस कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत प्रशांत गांधी (वय 48 वर्षे, रा. लासुर्णे ता. इंदापूर जि. पुणे. सध्या रा. ऋषिकेश अपार्टमेंट, पेन्सील चौक बारामती) या संशयित आरोपीला भा. द. वि कलम 328, 188 तसेच अन्नसुरक्षा आणि मानदे कायदा 2006 मधील कलम 26 (2) (प) सहवाचा कलम 3 (1) (ZZ) (V) शिक्षा कलम 59 तसेच कलम 26 (2) (4) सहवाचा अन्न सुरक्षा आयुक्त यांचे दि. 18 जुलै 2013 चे आदेश, कलम 27 (3) (डी) शिक्षा कलम 27 (3) (इ) शिक्षा कलम 59 नुसार अटक करण्यात आली. तसेच या कारवाईत निसार (पुर्ण नाव माहित नाही) (रा. विजापुर, कर्नाटक) आणि राहुल मलबारी (रा. यवत ता. दौंड जि. पुणे) यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बारामती तालुक्यातील मौजे उंडवडी सुपे गावच्या हद्दीत संशयित आरोपी प्रशांत गांधी याचे विद्युत सबस्टेशन जवळील फार्म हाऊसमध्ये त्याचेकडे असलेल्या वाहन नंबर एम. एच 12 के. पी 9674 याने वाहतुक करून तब्बल 20 लाख रुपये किंमतीचा अवैध गुटखा महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयुक्त यांचे प्रतिबंधीत आदेश क्रमांक असुका/181/21/07/असुक अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य दिनांक 12/02/2021 नुसार महाराष्ट्र राज्यात गुटखा पान मसाला घटीत होवुन होवू शकेल असा पदार्थ सुगंधी स्वादीष्ट सुपारी आदीचे उत्पादन/साठा / वितरण/वाहतुक तसेच विक्री यावर बंदी असताना, सदर गुटखा हा मानवी आरोग्यास अपायकारक प्रतिबंधीत पदार्थ असल्याची जाणीव असताना तसेच सदर बाबत शासनाने दिलेल्या आदेशाचा भंग करून तब्बल 20 लाख रुपये किंमतीचा पान मसाला गुटखा पदार्थ स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता विक्री वाहतुक व साठा करीत असताना मिळुन आले आहे. सदरचा साठा आरोपी नं, 2 याचेकडून आणून आरोपी नं.3 याचेकडे देण्याकरीता जात असताना मिळून आले. म्हणुन आरोपी प्रशांत गांधी, निसार (पुर्ण नाव व पत्ता माहिती नाही) व राहुल मलबारी याचे विरूध्द सरकारतर्फे भा. द. वि कलम 328,188 तसेच अन्नसुरक्षा आणि मानदे कायदा 2006 मधील कलम 26 (2) (प) सहवाचा कलम 3 (1) (ZZ) (v) शिक्षा कलम 59 तसेच कलम 26 (2) (4) सहवाचा अन्न सुरक्षा आयुक यांचे दि. 18 जुलै 2013 चे आदेश, कलम 27 (3) (डी) शिक्षा कलम 27 (3) (इ) शिक्षा कलम 59 प्रमाणे फिर्याद आहे.

सदर कारवाई ही पोलीस ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दुग्गल, बारामती उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनात बारामती शहर पोलीस आणि सुपे पोलीस यांच्या संयुक्तपणे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे करीत आहे. दरम्यान, सदर संशयित आरोपी प्रशांत गांधी याच्यावर अवैध गुटखा तस्करी करण्यावरून उरळी कांचन, बारामती ग्रामीण आणि आता सुपे या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपी प्रशांत गांधीवर मोक्का अंतर्गत कारवाई होणार का? उपविभागीय अधिकारी, बारामती यांच्याकडे तडीपा  हा प्रश्न सर्वसामान्य 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *