जय पवार यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अंतरवाली सराटी, 05 मे: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे युवा नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. त्याच्या या अनपेक्षित भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, त्यांची ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील आणि जय पवार यांच्यात कसलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

https://twitter.com/MayurShitole5/status/1787012718282887394?s=19



तत्पूर्वी, जय पवार हे आज सकाळी अचानकपणे अंतरवाली सराटी येथे पोहोचले. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील यांच्याकडून जय पवार यांचे स्वागत करण्यात आले. या भेटीनंतर जय पवार अंतरवाली सराटी हून पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, त्यांच्या या भेटीचे कारण समजू शकलेले नाही. ही भेट सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले आहे. तर जय पवार आणि मनोज जरांगे पाटील यांच्या या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.



दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होत आहे. बारामती मतदारसंघात येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यासाठी सध्या दोन्ही पक्षांच्या वतीने जोरदार प्रचार केला जात आहे. तसेच राजकीय नेते सध्या अनेक गावांना भेटी देताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर, जय पवार आणि जरांगे पाटील यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *