दिल्ली, 1 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) पेट्रोलियम कंपन्यांनी आजच्या दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. त्यानूसार, देशात 1 नोव्हेंबरपासून 19 किलोंचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 101.50 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 1,833 रुपयांना मिळणार आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात दिवाळीपूर्वीच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने याचा फटका हॉटेल व्यवसायिकांना बसणार आहे. तर सणासुदीच्या काळात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी दिलासादायक बाब म्हणजे, पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कसलीही वाढ केलेली नाही. त्यामुळे 14.2 किलोंचा एलपीजी सिलिंडर मुंबईत सध्या 902.50 रुपयांना मिळत आहे.
सरकारने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य नाही- जरांगे पाटील
आजच्या या दरवाढीमुळे, 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर राजधानी दिल्लीत आता 1833 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी हे गॅस सिलिंडर 1731 रुपयांना मिळत होते. तर मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 1785.50 रुपयांना मिळणार आहेत. तसेच कोलकाता येथे हा सिलिंडर 1943 रुपये आणि चेन्नईमध्ये 1999.50 रुपयांना झाला आहे.
धर्मांतरण करताना!
तत्पूर्वी, केंद्र सरकारने गेल्या 2 महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 309 रुपयांची वाढ केली आहे. तर गेल्या महिन्यात 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सुमारे 209 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे देशात सध्या महागाई वाढत चालली असल्याचे दिसत आहे. सणासुदीच्या काळात दिवाळीपूर्वीच गॅसचे दर वाढल्यामुळे व्यावसायिकांना मोठा धक्का बसला असतानाच दुसरीकडे, 14.2 किलोंच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. तर यापूर्वी केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी केल्या होत्या. त्यामुळे राजधानी दिल्लीत 14.2 किलोंचे एलपीजी गॅस सिलिंडर सध्या 903 रुपयांना मिळत आहे. तर सध्या हे गॅस सिलिंडर मुंबईत 902.50 रुपये, कोलकाता 929 रुपये आणि चेन्नईत 918.50 रुपयांना मिळत आहे.
One Comment on “सणासुदीच्या काळात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ”