फटाक्यांमुळे मुंबईतील प्रदूषणात आणखी वाढ

मुंबई, 13 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरातील हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून योग्य ती पाऊले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबई हायकोर्टाने दिवाळीच्या सणांमध्ये रात्री 8 ते 10 या दोन तासांसाठीच फटाके फोडण्याची परवानगी दिली होती. मात्र कोर्टाच्या या आदेशाकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे.

मुंबईत लक्ष्मीपूजन निमित्त काल सायंकाळपासूनच अनेक नागरिकांनी फटाके फोडण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्याचे पाहायला मिळाले. तसेच मुंबई आणि परिसरात काही ठिकाणी सोमवारी पहाटेपर्यंत फटाक्यांची आतिषबाजी होत असल्याचे आढळून आले आहे. याठिकाणी धुराचे लोट पाहायला मिळत होते. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागांतील प्रदुषण वाढले आहे.

शरद पवारांच्या कथित जात प्रमाणपत्रावर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

दरम्यान, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईत 24 तासांत 150 कोटी रुपयांचे फटाके फोडण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता अधिकच खराब झाली आहे. तर सध्या मुंबईची AQI पातळी 288 वर पोहोचली आहे. तत्पूर्वी, गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबईत अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे शहरातील धूळ कमी झाली होती. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी मुंबईतील प्रदुषण कमी झाले होते. मात्र आता दिवाळीच्या फटाक्यांमुळे मुंबईतील प्रदुषण पुन्हा एकदा वाढले आहे.

ओबीसी: दे धक्का कुणबी!

त्यामुळे मुंबई हायकोर्टाने यासंदर्भातील सुनावणीत फटाके फोडण्यासाठी रात्री 8 ते 10 ही वेळ निश्चित केली होती. तसेच त्यावेळी कोर्टाने मुंबईतील बांधकामांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे वाढत्या प्रदूषणावर मुंबईतील पालिका प्रशासन कोणता निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

One Comment on “फटाक्यांमुळे मुंबईतील प्रदूषणात आणखी वाढ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *