बारामतीच्या सुपुत्राची गगन भरारी

बारामती, 30 मार्चः बारामती तालुक्याचे क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांना पदोन्नती मिळाली आहे. या पदोन्नतीमुळे त्यांची नियुक्ती लातूर जिल्ह्याचे नवे क्रीडा अधिकारी म्हणून झाली आहे. या पदोन्नतीमुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जगन्नाथ लकडे यांची सुरुवात देशसेवेतून झाली आहे. भारतीय सेनेत त्यांनी 20 वर्षे सेवा देत सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी घरी राहून आराम करण्याऐवजी पुन्हा जिद्दीने मैदानावर उतरत आशियाई स्पर्धेत देशासाठी पदकाची कमाई केली. त्यानंतर त्यांना मुंबई येथे क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहू लागले. यादरम्यान, त्यांनी कुर्ला, अंधेरी, बोरविली, भोर, वेल्हा, पुरंदर आणि नुकतीच बारामती तालुक्यात क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *