सालेम, 28 मार्चः स्वतःला बाईक हवी, हे कोणाला वाट नाही. मात्र ही स्तुप्त इच्छा इतरांसाठी डोकेदुखी ठरू शकते. असाच वाईट अनुभव एका तरूणाच्या बाईक घेण्याच्या स्तुप्त इच्छेमुळे बाईक शो- रूमच्या कर्मचाऱ्यांना आला आहे. या पट्ट्याने सरळ शो-रूमला जात कॅशमध्येच स्पोर्ट बाईक विकत घेतली. यामुळे त्याचा आनंद गगनाला मावेना. मात्र या आनंदामुळे शो-रूमवाल्याची चांगलीच डोकेदुखी वाढवली.
यामागचे कारणही तसेच आहे. तामिळनाडू राज्यातील सालेम येथील एका तरूणाने बाईक घेण्यासाठी तब्बल 2 लाख 60 हजार रुपये रोख मोजले आहे. मात्र त्या तरूणाने हे पैसे नोटांच्या स्वरुपात दिले नाही. त्याने आपल्या मित्रांसोबत बाईकच्या शो- रूममध्ये जात चक्क 2 लाख 60 हजार रुपयांची 1 रुपयांची नाणी आणली. या तरूणाने मित्रासोबत शो-रूममध्ये बसत सर्व नाणी मोजून देत रोखीचा व्यवहार पूर्ण केला. मात्र या प्रकारामुळे शो-रूममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घामच फुटला.
सध्या या तरूणासह त्याच्या मित्राचे पैसे मोजतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरूणाला हे पैसे जमा करण्यासाठी 3 वर्षे लागल्याचे त्याने एएनआयच्या रिपोर्ट्सला माहिती देताना सांगितले.