ताक पिणे हे शरीरासाठी फायदेशीर राहते. ताक पिल्याने शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर टाकले जातात. तसेच ताक पिल्याने शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढण्याचे मदत होते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. यासह शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते. इतकेच नव्हे तर चेहऱ्यावर आलेले काळे डाग जावुन चेहरा तरतरीत आणि तेजस्वी दिसतो.
ताकमध्ये विटामिन B-12,कैल्शियम, पोटेशियम आणि फॉस्फोरस सारखे तत्व असतात, जे शरीरासाठी फारच फायदेशीर असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात, अशांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज 90 % भरून निघते. तसेच शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.
ताक पिण्याचे 10 फायदे आहेत.
– ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते.
– वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होण्यास मदत होते.
– सतत तोंड येण्याचा त्रास होत असल्यास दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास फायदा होतो.
– पोटातील जंतू मारण्यासाठी ताकात ओवा टाकून पिणे फायदेशीर राहते.
– लघवी करताना होणारी जळजळ बंद करण्यासाठी ताकात गुळ टाकून प्यायल्यास आराम मिळतो.
– ताकात थोडी जायफळ पूड टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
– रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
– ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
– लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.
– तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पित राहल्यास शरीराचे पंचकर्म आपोआप होते.
ज्या लोकांनी याआधी पैसे देवुन पंचकर्म केले आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा, तेव्हा लक्षात येईलच.
तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.