बारामती, 25 मार्चः महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत बारामती शहरातील आमराई विभागातील शुभम शिंदे आणि सूरज मोरे या दोन तरुणांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. मिळेल्या यशाबद्दल या तरुणांवर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
सामान्य कुटुंबातून येणारे शुभम शिंदे आणि सूरज मोरे यांनी खडतर प्रवास हा अनेक तरुणांना प्रेरणा देणारा आहे. अनेक समस्यांना तोंड देत त्यांनी यशाला गवसणी घातली आहे. या यशामुळे बारामती शहराच्या वैभवात भर पडली आहे. शुभम आणि सूरज या तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून दिवस- रात्र अभ्यास करत ध्येय गाठले आहे. या यशाबद्दल त्यांच्या कुटुंबासह मित्र परिवारात आनंदाचे वातावरण आहे.