बारामती, 2 डिसेंबरः बारामती नगरपरिषदेचे कर्मचारी युसुफ तांबोळी हे 37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 30 नोव्हेंबर 2022 रोजी निवृत्त झाले आहेत. बारामती नगरपरिषदेच्या सभागृहात युसुफ तांबोळी यांचा आज, 1 डिसेंबर 2022 रोजी निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला. या निरोप समारंभात मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते त्यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार करण्यात आला. तसेच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बानपचे कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, युसुफ तांबोळी यांनी त्यांच्या सहकर्मींसोबत 1987 रोजी तब्बल 12 दिवसांचे उपोषण केले होते. यामुळे त्यांना व त्यांच्या सहकर्मींना 1 डिसेंबर 1985 पासून कामावर कायम स्वरुपी रुजू करण्यात आले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक अधिकाऱ्यांना आणि सह कर्मचाऱ्यांना नेहमी मदतीच्या भावनेने सहकार्य करत आले. युसुफ तांबोळी हे नेहमी सह कर्मचाऱ्यांच्या अडचणीत धावून जात.
श्रमदानातून बांधला वनराई बंधारा
त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कधीही दबावाखाली काम केले नाही. तसेच स्वाभिमानाने बारामती नगरपरिषद आणि बारामती नागरीकांना सेवा दिली.
बारामतीत जागतिक एड्स दिनानिमित्त समानता संकल्पना
One Comment on “बानपचे युसुफ तांबोळी हे 37 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त”