कर्नाटकात महिलेला विवस्त्र करून मारहाण; 7 जणांना अटक

बेळगावी, 12 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) कर्नाटकातील बेळगावी येथे एका 42 वर्षीय महिलेला विवस्त्र करून मारहाण करत तिची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या महिलेचा 24 वर्षीय मुलगा एका 19 वर्षीय तरूणीसोबत पळून गेला होता. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, या तरूणीच्या घरच्यांनी आपल्या मुलीचे दूसरीकडे लग्न ठरवले होते.

https://twitter.com/ANI/status/1734405392900497902?s=19

ते दोघेजण पळून गेल्याची माहिती मिळताच, तरूणीच्या कुटुंबीयांनी या तरूणाच्या घराची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी तरूणाच्या आईला जबरदस्तीने ओढून नेले आणि तिला विवस्त्र केले. तसेच त्यांनी त्याच्या आईला मारहाण केली, तिची गावात धिंड काढली याशिवाय त्यांनी या महिलेला विजेच्या खांबाला बांधून तिला मारहाण केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी या महिलेची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. तर याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

https://twitter.com/ani_digital/status/1734453611101409537?s=19

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगावी भागातील एका तरूण आणि तरूणीचे एकमेकांवर प्रेम होते. हे दोघेही एकाच समाजाचे आणि एकाच गावातील आहेत. ते दोघे काल मध्यरात्री घरातून पळून गेले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या तरूणीच्या आई-वडील आणि नातेवाईकांनी या तरूणाच्या घरात घुसून त्याच्या आईसोबत हे दुष्कृत्य केले.

https://x.com/siddaramaiah/status/1734120811341152549?s=20

दरम्यान, या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. घटना अमानवीय असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. “बेळगावमध्ये महिलेला विवस्त्र करून, खांबाला बांधून मारहाण करणे अत्यंत अमानवी आहे. यामुळे संपूर्ण समाज चक्रावून गेला आहे. आमचे सरकार असे घृणास्पद कृत्य कोणत्याही कारणाने सहन करणार नाही. या प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे. तर दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे ही आपली संपूर्ण जबाबदारी आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *