बारामतीत दुकानाचा बोर्ड डोक्यात पडून महिलेचा मृत्यू

बारामती, 22 मेः बारामती तालुक्यातील सुपे येथे एका दुकानाचा बोर्ड डोक्यात पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, रविवारी 22 मे रोजी घडली. या घटनेमुळे सुपे परिसरासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, सदर महिला ही कुतवळवाडी येथील असून कामानिमित्त ती सुपे येथे आली होती. सुपे येथील एका तीन मजली इमारतीखाली दुकानाच्या बाहेर कुटुंबातील व्यक्तींची वाट पाहत त्या थांबल्या होत्या. वाऱ्यामुळे सदर तीन मजलीवर टांगलेला दुकानाचा बोर्ड महिलेच्या डोक्यात कोसळला. या अपघातामुळे सदर महिलेला गंभीर दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.

ग्राहकांना आकर्षक करण्यासाठी दुकानदार, शॉप मालक हे दुकानाची जाहिरातीसाठी मोठ मोठे बोर्ड वापरत असतात. या सारखे बोर्ड चौका चौकात रस्त्यांवर दिसतात. सदर जाहिरातींचे बोर्ड हे वजनदार असतात, तसेच त्यांच्या सुरक्षितेची कोणतीच काळजी घेतलेली नसतात. केवळ टागलेले असल्याने सदर बोर्ड हे वादळी वाऱ्यात खाली कोसळतात. या घटनेनंतर असे बोर्ड किती धोकादायक ठरू शकतात, याची प्रचिती समोर आली आहे. या घटनेनंतर वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *