बारामतीत तक्रार केल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण

बारामती, 10 ऑगस्टः बारामती येथील खंडोबा नगरमधील भोई समाजातील काही लोकांनी वडार समाजातील काही कुटुंबांविरोधात बारामती नगर परिषद तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. या तक्रारीत वडार समाजातील काही कुटुंब वराह पालन करत आहे. त्यामुळे परिसरात घाण, दुर्गंधीचा त्रास होत आहे. असे या दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

मतदान कार्डशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी विशेष मोहीम

या तक्रारीचा राग मनात धरून भोई समाजातील स्रियांना मारहाण झाल्याची घटना आज, 10 ऑगस्ट 2022 रोजी घडली आहे. सदर मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

संबंधित भोई समाजातील कुटुंबातील तक्रारदाराचे म्हणणे आहे की, सदर ठिकाणी वराह पालनाने होत असलेल्या परिसरात घाण आणि दुर्गंधी पसरत आहे. यामुळे आजू बाजूच्या रहिवाशांना या दुर्गंधीचा खूप त्रास होत आहे. तसेच या संदर्भात बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता. पोलीस स्टेशनला दोन्ही पक्षकारांना बोलावून आपापसात वाद मिटवून घेण्यासाठी वेळ दिला होता. मात्र आज दोन्ही समाजामध्ये चर्चेतून वाद विकोपाला गेला. वडार समाजातील पुरुषांनी भोई समाजातील महिलांवर हात टाकून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

दोन्ही गटातील लोक पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी आले आहेत. भोई समाजातील नागरिक पोलीस प्रशासनाकडून न्यायाची मागणी करत आहेत. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *