बारामती, 5 डिसेंबरः बारामती तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात मटका धंधा फोफावला आहे. सध्या बारामती तालुक्यातील तब्बल सर्वच गावात मटक्याचे अड्डे थटल्याचे चित्र आहे. या मटक्यांच्या नादात अनेकाची कुटुंबे देशोधोडीला गेल्याचे चित्र आहे. मात्र, या सर्रासपण, थाटात सुरू असलेले मटक्यांचे अड्डे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही संदेह निर्माण होत आहे.
मटक्याच्या धंद्यापायी आतापर्यंत चार खून
पूर्वीपासूनच बारामती तालुक्यात मटका व्यवसायीत मोठ्या जोमात मटका धंदे चालविताना दिसत आहेत. या मटक्याच्या धंद्यापायी आतापर्यंत चार खून झाल्याची नोंद आहे. पुर्वीचे मटका किंग म्हणून ओळखले जाणारे कृष्णा जाधव यांचा देखील अतिशय निर्घुनपणे खून केला होता. त्यानंतर एका तरूणीचाही कोयत्याने सपासप वार करत हत्या करण्यात आली. तर नुकतीच या मटक्याच्या पैशावरून मोरगाव रोडवर एका पती पत्नीची दिवसाढवळ्या चाकूने सपासप वार करत हत्या करण्यात आली. मात्र, या वाढत्या गुन्हेगारीला समुळ नष्ट पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देखमुख आणि पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे यांना अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे बारामती तालुक्यात फोफावणारे हे मटक्याचे धंदे पोलीस आशीर्वादने तर चालू नाही ना? असा प्रश्न सामान्य बारामतीकरांच्या मध्ये कुजबुजला जात आहे.
मटकावाल्यांवर कारवाई कधी होणार?
सध्या बारामती तालुक्यात नवा मटका किंग उदयास आला आहे. बारामती तालुक्यात मटका किंग धोत्रे आणि त्याच्या साथीदारांकडून सध्या मोठ्या प्रमाणात मटका घेतला जात आहे. मात्र, याउलट मटका किंगकडून हे धंदे सुरू ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हप्ते चालू असल्याचे दबक्या आवाजात पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे. या कारणामुळेच बारामती तालुक्यातील फोफावलेल्या मटकावाल्यांवर कारवाई होत नाही का? हा प्रश्न भारतीय नायकच्या माध्यमातून विचारण्यात येत आहे.