शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन रोहित पवार ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर

मुंबई, 24 जानेवारीः(विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यानूसार, रोहित पवार हे आज मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडी कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी करण्यात आली. तत्पूर्वी, ईडी चौकशीला हजर होण्याच्या आधी रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात शरद पवारांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर रोहित पवार हे ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे होत्या.

https://twitter.com/ANI/status/1750021732881293521?s=19

https://twitter.com/ANI/status/1750022224432779537?s=19

https://twitter.com/AHindinews/status/1750030374615589308?s=19

ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची निदर्शने

यावेळी रोहित पवार यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी आपल्या आत्या म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील आशीर्वाद घेतले. त्यानंतर रोहित पवार हे ईडी कार्यालयाच्या आत गेले. महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँक कथित घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांची सध्या ईडी चौकशी करीत आहे. या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी-शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने केली आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली.

https://twitter.com/ANI/status/1750024677937098783?s=19

https://twitter.com/ANI/status/1750026788548514113?s=19

सत्याचा विजय होणार: सुप्रिया सुळे

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सत्यमेव जयते, सत्याचा विजय नक्की होणार, असा विश्वास सुप्रिया सुळेंनी यावेळी व्यक्त केला. “तपास पारदर्शक आणि निष्पक्ष असावा. माझा ईडीवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की ते रोहित पवारांची बाजू ऐकतील. आम्ही सर्व यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार आहोत. कारण, आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही. आम्ही काही चुकीचे केले नसेल तर तपासाच्या दबावाखाली येण्याचा प्रश्नच येत नाही,” अशा त्या यावेळी म्हणाल्या.

https://twitter.com/ANI/status/1750018884961448358?s=19

शरद पवार आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात

दरम्यान, रोहित पवारांची आज ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत दिवसभर राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात बसून राहणार आहेत. तत्पूर्वी, काल रोहित पवारांनी ट्विट करून आपण ईडी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले होते. तसेच सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत ईडीने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये. उलट, आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं रहावं, असे आवाहन रोहित पवारांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *