राज्यासह पुण्यात आज थंडीचा जोर वाढला

पुणे, 04 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुणे आणि महाराष्ट्रात आज (दि.04) थंडीचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी एकच अंकी आकडा तापमान नोंदवले गेले आहे. गेल्या काही दिवसांत थंडीचा जोर कमी होता, मात्र वातावरण बदलल्यामुळे खऱ्या अर्थाने नागरिकांनी आज सकाळी हिवाळ्याचा अनुभव घेतला. त्यानुसार, राज्यात आज सकाळी अहिल्यानगर येथे सर्वात कमी तापमान 7.7 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. त्याचबरोबर नागपूर (9 अंश सेल्सिअस), पुणे (9.6 अंश सेल्सिअस) आणि नाशिक (10.1 अंश सेल्सिअस) येथेही थंडीचा चांगला अनुभव आला आहे.

https://x.com/Hosalikar_KS/status/1875388773154091341?t=kk6edL7GxGAZo8VhqM2G4g&s=19

पुणे जिल्ह्यातही थंडीचा प्रभाव

पुण्याच्या हवेली भागात आज सकाळी तापमान 8 अंश सेल्सिअस पर्यंत घसरले होते, तर शिवाजीनगर आणि पाषाण येथे तापमान अनुक्रमे 9.6 अंश सेल्सिअस आणि 10 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तसेच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत देखील आज थंडीचा प्रभाव पहायला मिळाला होता. ग्रामीण भागांमध्ये बारामतीत 9.2 अंश सेल्सिअस, तळेगाव मध्ये 9.8 अंश सेल्सिअस आणि शिरूर येथे 9.2 अंश सेल्सिअस इतके तापमान या ठिकाणी नोंदवले गेले आहे. तर थंडीचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.



पुणे जिल्ह्यातील तापमान: (दि.04 जानेवारी)

खेड 17.8 अंश सेल्सिअस, लवळे 16.4 अंश सेल्सिअस, पुरंदर 11.5 अंश सेल्सिअस, मगरपट्टा 16.1 अंश सेल्सिअस, लोणावळा 11.4 अंश सेल्सिअस, चिंचवड 15.7 अंश सेल्सिअस, राजगुरूनगर 10.4 अंश सेल्सिअस, गिरीवन 15.0 अंश सेल्सिअस, दौंड 10.2 अंश सेल्सिअस, दापोडी 14.9 अंश सेल्सिअस, पाषाण 10.0 अंश सेल्सिअस, भोर 14.9 अंश सेल्सिअस, माळीण 10.0 अंश सेल्सिअस, बल्लाळवाडी 14.8 अंश सेल्सिअस, तळेगाव दाभाडे 9.8 अंश सेल्सिअस, कोरेगाव पार्क 14.7 अंश सेल्सिअस, शिवाजीनगर 9.6 अंश सेल्सिअस, नारायणगाव 12.7 अंश सेल्सिअस, बारामती 9.2 अंश सेल्सिअस, तळेगाव ढमढेरे 12.6 अंश सेल्सिअस, शिरूर 9.2 अंश सेल्सिअस, आंबेगाव 12.2 अंश सेल्सिअस, एनडीए 8.7 अंश सेल्सिअस, निंबगिरी 12.2 अंश सेल्सिअस, हवेली 8.0 अंश सेल्सिअस.

https://x.com/Hosalikar_KS/status/1875390353693687940?t=Kbj_wy5_p24fiFgPZncLQQ&s=19

महाराष्ट्रातील तापमान: (दि.04 जानेवारी)

परभणी 11 अंश सेल्सिअस, सातारा 12.5 अंश सेल्सिअस, नाशिक 10.1 अंश सेल्सिअस, रत्नागिरी 18.9 अंश सेल्सिअस, कोल्हापूर 15.3 अंश सेल्सिअस, चिकलठाणा 11.6 अंश सेल्सिअस, उदगीर 11.5 अंश सेल्सिअस, मालेगाव 12 अंश सेल्सिअस, सोलापूर 13.6 अंश सेल्सिअस, मांडवा 13.8 अंश सेल्सिअस, हरनाई 20.8 अंश सेल्सिअस, नांदेड 11.2 अंश सेल्सिअस, बारामती 9.2 अंश सेल्सिअस, अहिल्यानगर 7.7 अंश सेल्सिअस, डहाणू 16.7 अंश सेल्सिअस, जळगाव 9.6 अंश सेल्सिअस, पुणे 9.6 अंश सेल्सिअस, सांगली 13.2 अंश सेल्सिअस, माथेरान 17.8 अंश सेल्सिअस, नागपूर 9 अंश सेल्सिअस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *