मुंबई, 25 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल 2024 ची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार, आयपीएलचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. या लिलावापूर्वी ट्रेडिंग विंडो सध्या खुली करण्यात आली आहे. ही विंडो 26 नोव्हेंबरपर्यंत खुली राहणार आहे. ज्यामध्ये संघ खेळाडूंची देवाणघेवाण करू शकतात. यासाठी संघांच्या मालकांना खेळाडूंची परवानगी घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत रोमॅरियो शेफर्ड, देवदत्त पडिक्कल आणि आवेश खान या खेळाडूंची अदलाबदल करण्यात आली आहे. यामध्ये रोमारियो शेफर्ड याला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात खरेदी केले आहे. तर देवदत्त पडिक्कल हा राजस्थान रॉयल्समधून लखनौ सुपर जायंट्समध्ये आला आहे. त्याबदल्यात लखनौ सुपर जायंट्सच्या आवेश खानची राजस्थान रॉयल्स संघात निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान, या ट्रेडिंग विंडोमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यात मोठा करार होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. हा करार झाल्यास तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा करार होऊ शकतो. तर हार्दिकच्या बदल्यात मुंबई इंडियन्स आपला कर्णधार रोहित शर्मा किंवा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला गुजरात संघात पाठवू शकतो, असे म्हटले जात आहे. मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी; कराड दौरा रद्द
तर क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या हा गुजरात टायटन्सचा संघ सोडण्यास तयार आहे. तर हार्दिक आता मुंबई इंडियन्स संघात जाऊ शकतो. यासाठी मुंबई इंडियन्स संघाचे फ्रँचायझी गुजरात टायटन्सला 15 कोटी रुपये देऊ शकतात. मात्र, यासंदर्भात दोन्ही संघांच्या फ्रँचायझीने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, हार्दिक पांड्याला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सकडे पुरेसे पैसे शिल्लक नाहीत. मुंबईकडे सध्या केवळ 50 लाख रुपये इतकी रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला हार्दिक पांड्याला आपल्या संघात घेण्यासाठी बड्या खेळाडूंना सोडावे लागणार आहे. दरम्यान खेळाडू अदलाबदली करण्याची अंतिम मुदत 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता संपणार आहे. त्यामुळे कोणते खेळाडू कोणत्या संघात जाणार? याचे चित्र तेंव्हाच स्पष्ट होईल.
2 Comments on “हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतणार?”