दिल्ली, 25 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याला आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात खेळताना दुखापत झाली होती. या सामन्यात हार्दिक गोलंदाजी करीत असताना त्याच्या उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला गेल्या न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात खेळता आले नव्हते. मात्र, आता हार्दिक पांड्याच्या दुखापती विषयी नवीन अपडेट समोर आली आहे. हार्दिकची ही दुखापत फारशी गंभीर नसल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. हार्दिक पांड्याची ही दुखापत गंभीर नाही. त्यामुळे तो लवकरच फिट होईल आणि इंग्लंड विरुद्धचा खेळेल, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा संपन्न
दरम्यान, हार्दिक पांड्या सध्या त्याच्या या दुखापतीवर एनसीएमध्ये उपचार घेत आहे. तत्पूर्वी, हार्दिक पांड्या 22 ऑक्टोंबर रोजी झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात खेळला नसल्यामुळे टीम इंडियामध्ये 2 बदल करीत सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी यांना संधी देण्यात आली होती. मात्र, या सामन्यात टीम इंडिया फलंदाजी करीत असताना त्यांना हार्दिकची उणीव भासली होती. त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट व्हावा, अशी अपेक्षा भारतीय संघ करीत आहे. दरम्यान, भारताचा इंग्लंड विरुद्ध येत्या 29 ऑक्टोंबर रोजी सामना खेळविण्यात येणार आहे. हा सामना लखनौच्या मैदानावर होणार आहे. तर या सामन्याच्या आधी हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट होईल का? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत ठाकरे आणि शिंदे यांचा दसरा मेळावा
One Comment on “हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्ध पुनरागमन करणार?”