राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीस उपस्थित राहणार- रामदास आठवले

मुंबई, 12 जुलैः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या 15 जुलै रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस देशभरातून रिपाइं चे सर्व राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या महत्वपूर्ण बैठकीत येत्या 15 जुलै रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे, अशी माहिती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक 15 जुलै रोजी दुपारी 3 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड.बी के बर्वे यांच्या निरीक्षणाखाली करण्यात येणार असल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.

बारामती पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडतची तारीख जाहीर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *