बारामती, 27 मेः बारामती नगर परिषद येथील संगणक ठेकेदारावर विशेष मेहेरबान दिसून येत आहे. सदर निविदा ठेका भाटिया नावाच्या पुण्याच्या व्यक्तीला दिला होता, तोही फक्त 2018-19 या वर्षासाठी दिला होता.
सदर ठेकासाठी बारामती नगर परिषदेने 61 लाख 39 हजार 440 रुपयांनी ठेका दिला होता. परंतु राजकीय हित संबंधातून व राजकीय हस्तक्षेपणामुळे नियमबाह्य पद्धतीने सदर कामगार ठेका मुदत संपून ही चालूच आहे.
एकूण 20 संगणक चालक भरायचे असतानाही कधी कमी तर कधीच जास्त चालक भरून ठेकेदार बारामती नगरपरिषदेची आर्थिक लूट करत आहे. कामगारांना किमान वेतन 25 हजार 581 रुपये देणे करारात नमूद असताना कामगारांना 10 हजार ते 12 हजार रुपये पगार देऊन कामगारांची पिळवणूक चालू आहे. यावर काही कामगारांनी कामगार न्यायालयाकडे दाद मागितली असून संबंधित प्रकरण प्रलंबित आहे.
ठेका संपला असतानाही या पुण्याच्या कंपनीला बेकायदेशीर मुदतवाढ देऊन कुणाचे हितसंबंध जोपासत आहे? हे सर्वसामान्यांना समजण्याच्या पलीकडे आहे. सदर कंपनीचा एक सुपरवायझर बारामतीचा आहे. त्या सुपरवायझरच्या मार्फत आर्थिक हितसंबंध जोपासत आहे. कामगारांची पिळवणूक होत आहे. सर्वसाधारण बारामतीकरांना या प्रकारांनी मानसिक त्रास होत आहे. तरी संगणक चालक ठेका तत्काळ रद्द करावा, अशी मागणी सर्वसामान्य बारामतीकरांकडून होत आहे. ठेकेदाराचा व सुपरवायझरचा राजकीय संबंध भक्कम असल्यामुळे अनेक नियमबाह्य गोष्टी घडत आहेत.