अनुसूचित जातीच्या दरवर्षी 200 कोटींचा हिशोब कोण देणार? – यशपाल (बंटीदादा) भोसले

बारामती, 2 जूनः बारामती नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2022 होऊ घातल्या आहेत. यामुळे बारामती नगर परिषदेचे आर्थिक गैरव्यवहार बद्दल यशपाल भोसले (बंटीदादा भोसले) यांनी काही मूलभूत प्रश्न निर्माण केले आहेत.

बारामती नगर परिषदेचा आर्थिक संकल्प हा 1200 कोटींचा आहे. सदरचा पैसा हा बारामती नगर परिषदेच्या 1 लाख 8 हजार लोकसंख्येवर खर्च करायचा असतो. त्यातील अनुसूचित जातीमधील लोक बारामतीमधील महार, बुद्ध, मांग, गारुडी, चांभार, ढोर, मांग-गारुडी, महेत्तर, खाटीक, होलार आदी जातींची लोकसंख्या 20 हजार पेक्षा जास्त आहे. म्हणजेच आर्थिक संकल्पनातील 20% रक्कम अनुसूचित जातींवर खर्च करणे कर्मप्राप्ती आहे. असे असताना बारामती नगर परिषद प्रशासन व शासक अनुसूचित जातीच्या वस्त्यांना हा खर्च करत नाही.

साधा हिशोब आहे, 200 कोटी रुपये भागिले 20 हजार लोकसंख्या = 1 लाख रुपये (2000000000÷20000=100000)प्रति अनुसूचित जातीच्या व्यक्ती साठी खर्च केले पाहिजे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य आदी खर्च अपेक्षित आहे.

आम्ही या बारामती नगर परिषदेचे नागरिक आहोत, मतदार आहोत आमच्या मूलभूत गरजा आणि मूलभूत सुविधा ही पुरवल्या जात नाही. भिकाऱ्यासारखे जीणं या प्रस्थापित राजकारणी व प्रशासनाने करून ठेवले आहे. मूलभूत पायाभूत सुविधा आम्हाला दिले जात नाही. पावसाळ्यात पाण्याचे डबक्यात व उन्हाळ्यात तहान हा शाप आम्हाला प्रस्थापित राजकारणांनी दिला आहे.

त्यामुळे आमच्या पैशाच्या हिशोब कोण व कधी देणार? आमच्या मूलभूत गरजा व हक्क आम्हाला कोण मिळून देणार? अशी विचारणा यशपाल भोसले (बंटीदादा भोसले) यांनी ‘भारतीय नायक’ला दिलेल्या मुलाखती दरम्यान केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *