मुंबई, 26 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यावेळी काही आंदोलकांनी दगडफेक केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ऋषिकेश बेदरे, कैलास सुरवसे आणि शनी सिरसट अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना कोर्टाने 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात?
— nitesh rane (@NiteshNRane) November 26, 2023
अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली.
पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण… pic.twitter.com/Nti9p7ortQ
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आरोपी ऋषिकेश बेदरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोबत असलेला एक फोटो शेयर केला आहे. या फोटोत राजेश टोपे हे देखील दिसत आहेत. नितेश राणे यांनी हा फोटो शेयर करीत “पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला?” असा सवाल त्यांनी थेट शरद पवार यांना केला आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी त्यांच्या या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरे याने शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. 1 सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर 3 सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?” असे ट्विट त्यांनी केले आहे. तर नितेश राणे यांच्या या ट्विटमुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.
26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली
One Comment on “दगडफेकीचा कट कोणी रचला? नितेश राणेंचा शरद पवारांना सवाल”