राज्यात विधानसभा निवडणूक कधी होणार? निवडणूक आयुक्तांनी दिले संकेत

मुंबई, 29 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने शनिवारी (दि.29) महाराष्ट्राला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील 11 राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी मुंबई येथे विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी निवडणुकीची तारीख जाहीर करण्यापूर्वी राज्यातील सणांचा विचार करावा, अशी मागणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे केली. याची माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

https://x.com/ANI/status/1839979456972087399?t=sxdKLeobpCqrFORR3u_mGg&s=19

https://x.com/ANI/status/1839976232668020846?t=Xy96NBf4AzD6Oh2NxaYx0Q&s=19

निवडणूक कधी होणार?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी होणार? असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडलेला आहे. यासंदर्भात राजीव कुमार यांनी मोठे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका घ्याव्या लागतील, असे राजीव कुमार यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यात दिवाळीनंतरच विधानसभा निवडणूका होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राजीव कुमार यांनी यावेळी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखेसंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही.

https://x.com/CEO_Maharashtra/status/1839974441503338967?t=HyS17AJxCmTjrZITNMWd2g&s=19

राज्यात 9.59 कोटी मतदार

दरम्यान, राज्यात एकूण 288 मतदारसंघात विधानसभेची निवडणूक होणार आहे. ज्यामध्ये खुला वर्गाचे 234 मतदारसंघ, अनुसूचित जमाती 25 आणि अनुसूचित जाती 29 यांच्यासाठी मतदारसंघ आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण 9.59 कोटी इतके मतदार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या 4.64 कोटी, तर पुरूष मतदारांची संख्या 4.95 टक्के इतकी आहे. याशिवाय राज्यात 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या उत्साहवर्धक आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत यंदा एकूण 19.48 लाख मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. याबाबतची माहिती देखील निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *