बारामती, 30 डिसेंबर: बारामती येथील मयत अनिकेत सदाशिव गजाकस, या मागासवर्गीय ढोर जातीचा तरुण मुलाचा जातीयवादी प्रवृत्तीने निघून हत्या घडवली आहे. भर रस्त्यावर त्याला ताणून कोयत्याचे सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. त्याच्या मृत्यू देहावर या राक्षसी प्रवृत्तीने त्याच्यावर सोळा वार केले असून त्याचे मनगट हातापासून वेगळे केले आहे. त्याच्या डोक्यावर, मानेवर व गळ्यावर राक्षसी प्रवृत्तीच्या हत्याऱ्याने त्याचे शरीर छिन्न-भिन्न केले आहे. दुर्दैवाने हे होत असताना आजूबाजूला शेकोटीची उब घेत असलेला एकही सुज्ञ नागरिक ही हत्या रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच परिसरात मयत अनिकेत हा सातत्याने येत जात असे. मयत अनिकेत याची मैत्री तेथील असंख्य मुलांशी होती, परंतु त्याला वाचवण्यासाठी कोणीही मायेचा लाल समोर आला नाही.
अनिकेत गजाकस हत्या प्रकरण
ही हत्या का व कशासाठी झाली? मूलभूत प्रश्न आहे. एका सुवर्ण मुलीशी एक मागासवर्गीय (ढोर) समाजाचा तरुण समाज माध्यमातून सुवर्ण मुलीशी बोलतो, संवाद साधतो. हा राग मनात धरून जातीय द्वेषातून ही निर्गुण हत्या करण्यात येते. समाज माध्यमातून बोलले म्हणून कुठलाही तरुणाची हत्या झाली, असे आम्ही वाचले नाही, बघितले नाही किंवा ऐकले नाही. असे असतानाही हत्या फक्त ना फक्त जातीय द्वेषातून झाली आहे.
संबंधित मुलीचे मयत अनिकेतशी काय संबंध होते की नाही? हे तपासामध्ये स्पष्ट होणार आहे. पण त्या समाज माध्यमातून त्यांचे संवाद निश्चित होतात, असे असेल तर या प्रकरणात पोलीस प्रशासनाने तपासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? हे एकदा आपण समजून घेऊ.
ही हत्या 19 डिसेंबर 2024 रोजी घडली. हत्येची फिर्याद 20 डिसेंबर 2024 रोजी दिली. तर 23 डिसेंबर 2024 रोजी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर 25 डिसेंबर 2024 रोजी शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हातील कलमे वाढवली. एडिशनल एसपी साहेबांनी या प्रकरणात 12 तासात आरोपींना पकडल्याने स्वतःची पाठ थोपटून घेऊन आरोपींना अटक केले म्हणून रोखीचे बक्षीस जाहीर करून आनंद उत्सव साजरा केला. मात्र आम्हाला सर्वसाधारण बारामतीकर म्हणून काही प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे.
या प्रकरणामुळे निर्माण झालेले प्रश्न –
पहिला प्रश्नः या गुन्ह्यातील हत्यार कोयता आहे. प्रथमतः शस्त्र अधिनियम खाली गुन्हा दाखल करण्यात का आला नाही?
दुसरा प्रश्नः मयत अनुसूचित जातीमधील ढोर जातीतील असून त्याचा खून एक सुवर्ण व दोन दलित यांनी हत्या केली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल का झाला नाही?
तिसरा प्रश्नः आरोपी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम फेसबुक स्टेटस स्टोरी या समाज माध्यमावर शस्त्र घेऊन आम्ही 302 करणार आहोत, असे असतानाही पोलिसांनी त्यांच्यावर तत्काळ आयटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल करून त्यांची जायबंदी का केली नाही?
चौथा प्रश्नः या गुन्ह्याच्या ठिकाणी परिसरात जे गुन्हेगार प्रवृत्तीचे टोळ्या कार्यरत आहेत किंवा कार्यरत होत पाहत आहेत, अशा टोळी सदस्य व प्रमुखांना पोलिसांनी झाडाझडती का केली नाही?
पाचवा प्रश्न: या आधीही एक मडर झाल्यानंतर या परिसरात पोलीस ग्रस्त का वाढवली नाही?
सहावा प्रश्नः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मयताच्या घरी भेट का दिली नाही?
सातवा प्रश्नः मयताच्या कुटुंबाच्या घरच्या परिसरात पोलिसांनी ग्रस्त का वाढवली नाही?
आठवा प्रश्न: गुन्ह्यात तपासी यंत्रणेला प्रथम दर्शनी साक्षीदार मिळत नाही, हे खरे आहे का?
नववा प्रश्न: या हत्यामध्ये मुख्य सूत्रधाराचे नाव पुढे का येत नाही?
दहावा प्रश्न: या हप्त्यामध्ये हत्येचा मास्टर माइंड, त्यांना गाडी पुरवणारा त्यांच्या चार-पाच दिवस कटामध्ये मार्गदर्शन करणारा नेमका कोण……?
अकरावा प्रश्न: अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार बारामती तहसीलदार यांना अजूनही माहिती का कळवली नाही?
माननीय ॲडिशनल एसपी साहेब समाजामध्ये कायद्याविषयी जागृती करणे (आवरणेस), असे आपण म्हणला होता. परंतु पोलिसांच्या कार्य पद्धतीबद्दल कायदेशीर प्रक्रिया जागृती अभियान पोलिस खात्यातच चालवले पाहिजे, असे आपणास वाटत नाही का? पोलीस आणि समाज मधला सु-संवाद कमी झालाय असे वाटत नाही का? पोलीस स्टेशन मधील गुन्हेगारी दलाल व राजकीय दोन नंबरचे प्रमाण वाढले असे आपल्याला वाटत नाही का? कायदा मांडणाऱ्यांना भीती व कायदा न मानणाऱ्यांना कृषी असे वातावरण आपल्या कार्यक्षेत्रात निर्माण झाले नाही ना?
कृपया सर्व सामान्यांना कायदा विषय संविधानाविषयी जागृती अभियान (आवरनेस) आपल्या पोलिसांना या मार्फत समाज सुधारणा पोलीस शाखेपासून सुरू करावे व माजी पोलीस एसपी खोपडे साहेबांनी चालू केलेला मोहल्ला कमिटी अभियानही पोलीस आणि सर्वसाधारण लोकांमध्ये सुसंवाद झाले होते व गुन्हेगारांवर व गुन्हेगारी प्रवृत्तीनाही गुन्हे करण्याची प्रवृत्ती कमी करण्यास मदत झाली होती आणि क्राईम रेट ही कमी झाला होता. शांतता प्रस्थापित झाली होती. साहेब आपणास खूप खूप शुभेच्छा आपण हे हे काम आपल्या कार्यक्षेत्रात सुरू करावे आणि खोपडे साहेब सारखा आपणही समाजामध्ये आणि पोलिसांमध्ये आदर्श आचारसंहिता सुरू करावी, ही विनंती.
टीपः- बारामतीमध्ये गुन्हेगारी व गुन्हेगारी प्रवृत्ती का वाढत आहे? पुढील बातमी बघा..