केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे काय म्हणाले?

मुंबई, 22 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने काल अटक केली. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासोबत काम करणारे, दारूविरोधात आवाज उठवणारे अरविंद केजरीवाल आता दारू धोरणे बनवत आहेत. त्यांना त्यांच्या स्वत:च्या कृत्यांमुळे अटक झाली आहे, असे अण्णा हजारे म्हणाले आहेत. ज्यांची चूक झाली त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे, असे देखील अण्णा हजारे यावेळी म्हणाले.

https://twitter.com/ANI/status/1771068556655956475?s=19

अण्णा हजारे काय म्हणाले?

दारूची नीती संपवली पाहिजे. पण अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यात हे बसले नाही. त्यांनी दिल्लीत दारू नीती केली. शेवटी या दारू नीती मुळे अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. आता त्यांना जी अटक झाली, सरकार आणि ते बघून घेतील. ज्यांची चूक झाली त्यांना सजा मिळालीच पाहिजे, अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

केजरीवाल अण्णा हजारेंचे जुने सहकारी

अरविंद केजरीवाल हे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे जुने सहकारी आहेत. अरविंद केजरीवाल हे 2011 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कथित भ्रष्टाचाराविरोधातील अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनातून अरविंद केजरीवाल यांनी प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर केजरीवाल यांनी 2012 मध्ये स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला आणि मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक लढवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *