अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुणे ते बारामती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीच्या स्वागतासाठी रस्ता क्रमांक 121 निरा रोड ते बारामती-इंदापूर रोड वर शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी थांबविण्यात आले होते. मात्र यामुळे या विद्यार्थ्यांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या व्हिडीओमधून अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून रॅलीचे स्वागत करायला लावणे, हे योग्य आहे का?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.