आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार, जरांगे पाटील यांचे विधान

संभाजीनगर, 28 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण येत्या 1 डिसेंबर रोजी जालना येथे सभा घेणार असल्याचे म्हटले आहे. या सभेत आपण बऱ्याचशा विषयांवर बोलणार असल्याचे विधान मनोज जरांगे यांनी यावेळी केले. गेल्या 70 वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी केली जात आहेत. यादरम्यान सगळेच पक्ष सत्तेत होते. या सगळ्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. याला सगळेच दोषी आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी सर्वसामान्यांना लढाई करावी लागत आहे. असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. तसेच मराठा समाज हा ओबीसीतूनच आरक्षण घेणार असल्याचे देखील जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

छगन भुजबळांची भूमिका, तीच सरकारची भूमिका – एकनाथ शिंदे

“सध्या सर्वच पक्ष आम्हाला घेरायचा प्रयत्न करतायेत. यामध्ये काही जणांना आमच्या विरोधात बोलण्यासाठी पुढे केले जात आहे. मधल्या काळात अनेकांनी संधी साधली आहे. यांसारख्या बऱ्याच विषयांवर मी 1 तारखेला जालन्यातील सभेत बोलणार आहे, असे ते यावेळी म्हणाले. तसेच अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सरकारच्या या कारवाईवर जरांगे पाटलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्य सरकारने मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मान्य केले होते. त्यामुळे त्यांना अटक करण्याची काय गरज होती? सरकारने हा काय डाव टाकलाय?” असा सवाल त्यांनी केला आहे.

मुर्टी ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

“राज्यात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची पिके वाया गेली आहेत. यासंदर्भात सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकरी बांधवांना मदत केली पाहिजे”, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुजबळ यांची भूमिका तीच सरकारची भूमिका असल्याचे वक्तव्य केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “छगन भुजबळ जातीय तेढ निर्माण करत आहेत, तीच सरकारची भूमिका आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

One Comment on “आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार, जरांगे पाटील यांचे विधान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *