मुंबई, 25 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निमंत्रण दिले होते. परंतू, राहुल गांधींना काही कारणास्तव या सभेला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे राहुल गांधी यांच्या जागी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सभेला हजेरी लावली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. तसेच त्यांनी यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. या सभेला लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
या देशात भीती निर्माण केलीय की, आमच्या विरोधात तुम्ही गेला, तर आम्ही धाडी टाकू आणि जेलमध्ये घालू.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) November 25, 2023
पण, खरं पाहिलं तर आपण देशाचे मालक आहोत आणि ते निवडून दिलेले नोकर आहेत मात्र, मालकाने आपलं मालकपण सोडून दिले आहे.
– ॲड. @Prksh_Ambedkar pic.twitter.com/6uOvVC7ebL
देशाला स्वातंत्र्य मिळवून 70 वर्षे ओलांडली. या 70 वर्षानंतर सुद्धा देशामध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. 2024 च्या निवडणूकीत हा कळीचा मुद्दा होणार यात दुमत नाही. इतर कार्यक्रमाबरोबर या देशाची असणारी संविधान बदलले पाहिजे की नाही? या दृष्टीने ही चर्चा आहे. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होतील. या निवडणुकीच्या अगोदर या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे, असा आमचा आग्रह असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटले.
“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या सभेला आले होते. मी त्यांच्याकडे एक आग्रह करतो की, वंचित बहुजन आघाडीने संविधानाच्या सन्मानाच्या निमित्ताने ही चर्चा केली, काँग्रेस पक्षाने देखील येत्या कालावधीमध्ये दुसऱ्या राज्यांत संविधानाची चर्चा करावी. यासाठी त्यांनी पब्लिक मीटिंग घ्यावी तसेच जनसभा घ्यावी. संविधान बदलण्याच्या आगोदर त्यावर चर्चा करणे आवश्यक आहे.” असे प्रकाश आंबेडकर या सभेत म्हणाले आहेत.
मरीआई देवीच्या मंदिरात चोरी
तसेच संविधान बदलण्याची भाषा केली जात असताना नवीन काय येणार? यासंदर्भात चर्चाच केली जात नाही. संविधान जुने झाले असे सांगून बदलाच्या चर्चा सुरू आहेत. संविधान ही एक व्यवस्था आहे, राज्य चालण्याची व्यवस्था आहे. ही व्यवस्था जिच्यावर लोकांचा विश्वास आहे. तिला तुम्ही आज बदलण्यास सांगता. परंतू नवी व्यवस्था काय येणार? हे तरी तुम्ही सांगा, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला.
अज्ञात वाहनेच्या धडकेत हरणाचा मृत्यु
“आज जी लोकशाही आहे त्याऐवजी तुम्ही ठोकशाही आणणार आहात का? तुम्ही जर ठोकशाही आणणार असाल ती कशा स्वरूपाची असणार? याचा आराखडा कसा असणार? ते तरी सांगा. तुम्ही म्हणत असाल लोकशाही राहणार, तर ती संसदीय लोकशाही असेल की अध्यक्षीय लोकशाही? हे तरी काही सांगा. संसदीय लोकशाही चालवणार असाल तर सध्याच्या संसदीय लोकशाहीत काय कमतरता आहे? याची तरी मांडणी करा.” असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. या देशात भीती निर्माण केलीय की, आमच्या विरोधात तुम्ही गेला, तर आम्ही धाडी टाकू आणि जेलमध्ये घालू. पण, खरं पाहिलं तर आपण देशाचे मालक आहोत आणि ते निवडून दिलेले नोकर आहेत. मात्र, मालकाने आपलं मालकपण सोडून दिले आहे. असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. भाजप, आरएसएस आणि त्यांची मित्र मंडळी यांना संविधान बदलायचे आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी संविधानाच्या बाजूने उभी राहणार, असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटले आहे. 3 डिसेंबरनंतर देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार होण्याची शक्यता आहे. पण जनतेला माझं आवाहन आहे की, भडकाऊ संघटना खूप आहेत, त्यांना सांगा की, तुमचा मुलगा आधी पुढं करा मग आम्ही येतो. असेही ते यावेळी म्हणाले.
तसेच प्रकाश आंबेडकर यांनी या सभेतून ओबीसी नेत्यांना देखील इशारा दिला आहे. आरक्षणावरून सध्या वाद सुरु झालाय. ओबीसी जे काही सध्या नेते आहेत त्यांनी कृपा करुन माझ्या नादी लागू नये. इतिहास काढला तर तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर कमंडल बरोबर होता. मग ते शेंडगे असतील किंवा भुजबळ असतील. जनता दलाबरोबर ओबीसी आरक्षण मिळवणारे आम्हीच होतो. आरक्षण वाचवता येत नाही म्हणून सध्याचे काही लोकं भिडवण्याची भाषा करत आहेत.” असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. तसेच शासनाने विकासाची योजना आखल्या नाहीत, त्यामुळे आरक्षण मिळालं की विकास होतो अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
One Comment on “संविधानाच्या बाजूने आम्ही उभे राहणार – प्रकाश आंबेडकर”