कोलकाता, 05 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपण विराट कोहलीला भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावरून हटवले नसल्याचे म्हटले आहे. 2021 च्या टी-20 विश्वचषकाच्या आधीच विराटने आपण भारताच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर 2021q च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळताना भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेनंतर विराटने भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले. तेंव्हा सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील मतभेदाच्या बातम्या समोर आल्या होत्या.
मराठा आरक्षण संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
या वादावर आता सौरव गांगुली यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “विराट कोहलीला आपण कर्णधारपदावरून कधीच हटवले नाही. मी त्याला सांगितले होते की, जर तुला टी-20 मध्ये संघाचे कर्णधारपद सोडायचे असेल, तर तुला संपूर्ण पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटचे कर्णधारपद सोडावे लागेल. त्यानंतर विराटने कसोटी फॉरमॅटचे कर्णधारपदही सोडले.” असे सौरव गांगुली यांनी सांगितले आहे. दरम्यान विराट कोहलीने भारताच्या वनडे संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याचे वक्तव्य चर्चेत आले होते. एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याबाबत त्याच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. असे त्याने म्हटले होते. विराटच्या या वक्तव्यावरून मोठा वाद झाला होता.
तसेच सौरव गांगुली यांनी यावेळी विराट कोहली विषयी म्हटले की, “विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनीनंतर विराट कोहलीने दीर्घकाळ क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. मात्र त्याला एकदाही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. परंतू त्याचवेळी विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रत्येक फॉरमॅटमध्ये नंबर वन संघ बनला. तसेच त्याच्या नेतृत्वात खेळताना भारताने परदेशी खेळपट्ट्यांवर देखील विजय मिळवला.”
ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टरला अटक
दरम्यान विराट कोहलीनंतर भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली. मात्र रोहित शर्मा 2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर एकपण आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळलेला नाही. या काळात भारतीय संघातील अनेक खेळाडूंना भारताच्या टी-20 संघाचे कर्णधार करण्यात आले. तर येत्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताने तिन्ही फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार ठेवले आहेत. यामध्ये टी-20 चे सूर्यकुमार यादव, वनडेचे केएल राहुल आणि कसोटी संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आले आहे.
One Comment on “विराटला आपण कर्णधार पदावरून हटवले नाही – सौरव गांगुली”