टीम इंडियाच्या सदैव पाठीशी – पंतप्रधान मोदी

अहमदाबाद, 20 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला आहे. या विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघ सहाव्यांदा विश्वविजेता बनला आहे. तर दुसरीकडे मात्र भारतीय क्रिकेट चाहत्यांचे तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपुरे राहिले. त्यामुळे या पराभवानंतर भारतीय चाहते निराश झाले आहेत.

भारताला हरवून ऑस्ट्रेलिया बनला सहाव्यांदा विश्वविजेता!

दरम्यान, हा सामना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून आपण भारतीय संघाच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. “प्रिय टीम इंडिया, या विश्वचषकात तुमची प्रतिभा आणि दृढनिश्चय लक्षात घेण्याजोगा होता. तुम्ही मोठ्या भावनेने खेळलात आणि देशाला मोठा अभिमान मिळवून दिला. आम्ही आज आणि नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत.” असे नरेंद्र मोदी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे कौतुक केले. “विश्वचषकातील शानदार विजयाबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन! स्पर्धेतील त्यांची प्रशंसनीय कामगिरी होती, ज्याचा शेवट शानदार विजयात झाला. आजच्या उल्लेखनीय खेळाबद्दल ट्रॅव्हिस हेडचे अभिनंदन.” असे ते या ट्विटमध्ये म्हणाले.

भारताचे ऑस्ट्रेलिया समोर 241 धावांचे लक्ष्य

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले आहे. “टीम इंडिया, तुम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली! जिंका किंवा हरा – आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. विश्वचषकातील शानदार विजयाबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन.” असे राहुल गांधींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विट करून टीम इंडियाचे सांत्वन केले. “आमच्या संघाने संपूर्ण विश्वचषकात उत्कृष्ट खेळ केला आणि संस्मरणीय कामगिरी केली. खर्‍या खिलाडूवृत्तीमध्ये विजय आणि अपयश या दोन्हींमधून अधिक मजबूत होणे समाविष्ट असते. मला विश्वास आहे की, तुम्ही आणखी मजबूत व्हाल.” असे ते यामध्ये म्हणाले.

One Comment on “टीम इंडियाच्या सदैव पाठीशी – पंतप्रधान मोदी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *