वायनाड भूस्खलन: मृतांचा आकडा 158 वर, बचावकार्य अजूनही सुरू

वायनाड, 31 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) केरळमधील वायनाड जिल्ह्यात मंगळवारी (दि.30 जुलै) मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यामध्ये आतापर्यंत 158 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. तसेच यात अनेकजण बेपत्ता झाले आहेत. या भूस्खलनामुळे ढिगार्‍याखाली अनेक लोक गाडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी लष्कराचे जवान, एनडीआरएफ, नौदल, पोलीस आणि वन विभागाचे पथक तसेच स्थानिक स्वयंसेवक उपस्थित आहेत. काल सकाळपासून याठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

https://x.com/AHindinews/status/1818529484452098483?s=19

https://x.com/AHindinews/status/1818512907048800677?s=19

बचावकार्याला वेग

काल खराब हवामानामुळे बचावकार्य करण्यात अडथळा निर्माण झाला होता. दिलासादायक बाब म्हणजे आज या ठिकाणचे हवामान कालच्या तुलनेत खूपच चांगले आहे. सध्या वायनाड जिल्ह्यात पाऊस पडत नाही. त्यामुळे बचावकार्याला वेग आला आहे. याठिकाणी सध्या लष्कर, एनडीआरएफ, नौदल, राज्य पोलीस आणि वन विभागाचे सुमारे 500 ते 600 कर्मचारी तसेच स्थानिक स्वयंसेवक या बचावकार्यात काम करीत आहेत. आतापर्यंत 200 हून अधिक लोकांना वाचविण्यात त्यांना यश आले आहे. या भूस्खलनात दुर्दैवाने दीडशे हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर यात शेकडो लोक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या परिस्थितीवर केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष आहे.

मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी

दरम्यान, वायनाड जिल्ह्यातील अनेक भागांत काल मुसळधार भूस्खलन झाले. त्यामुळे घरांचे आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक झाडे उन्मळून पडली असून, अनेक नद्यांना पूर आला. यामध्ये अनेक अजूनही अडकून पडले आहेत. सध्या बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची सुटका करण्यासाठी सर्व शक्य साधनांसह मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, केरळमधील भूस्खलनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *