आमराई परिसरातील पाणीपुरवठा नियोजित वेळेत करावा, आरपीआयची मागणी

बारामती, 18 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र (पप्पू) सोनवणे यांनी नुकतीच बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमराई परिसरातील स्थानिक महिला उपस्थित होत्या. बारामती शहरातील कोअर हाऊस, आमराई परिसरात होणाऱ्या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे येथील महिला भगिनींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

या मागण्या केल्या

त्यामुळे सदर परिसरातील पाणी पुरवठा नियमित पूर्वीप्रमाणे सकाळी 8 वाजता सुरू करावा तसेच प्रबुद्धनगर आणि आमराई येथील सार्वजनिक शौचालयातील पाण्याची विद्युत मोटार (पंप) दुरूस्त करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी रविंद्र सोनवणे यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे केली.

आंदोलनाचा इशारा

या मागण्यांचे लेखी निवेदन त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले. या दोन्ही मागण्या तत्काळ मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन यावेळी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिले. येत्या काळात जर या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षामार्फत आंदोलन करणार असल्याचा इशारा रविंद्र सोनवणे यांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *