बारमती, 14 जानेवारीः वर्षाच्या सुरुवातीलाच पाण्याची संक्रांत बारामती शहरावर आले आहे. आता शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे.
वंचितच्या तालुका संघटक पदी सागर गवळी यांची निवड
बारामती नगरपरिषद जलशुद्धीकरण केंद्र येथील तांत्रिक बिघाड आणि साठवण तलावातील अपुरा पाणी साठा यामुळे शनिवार आणि सोमवार दिनांक 14 आणि 16 जानेवारी 2023 रोजी बारामती शहर हद्दीमध्ये पाणीपुरवठा होणार नाही, असे बानपकडून जाहीर निवेदनात म्हटले आहे.
मुर्टीमध्ये राजमाता जिजाऊ आणि विवेकानंद यांची जयंती साजरी
मात्र रविवारी, 15 जानेवारी 2023 रोजी पाणीपुरवठा होणार आहे. तसेच मंगळवारी, 17 जानेवारी 2023 पासून पाणीपुरवठा दैनंदिन सुरु होणार असल्याचेही बारामती नगरपरिषदेकडून सांगण्यात आले आहे.