बारामती, 7 डिसेंबरः बारामती तालुक्यातील मेडद ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मेडद ग्रामपंचायतचा थकबाकीत विद्युत पुरवठ्यामुळे बंद केला आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात नागरीकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होऊ लागले आहेत.
दरम्यान, यासंदर्भात मंगळवारी, 6 डिसेंबर 2022 रोजी मेडद ग्रामस्थांनी बारामती पंचायत समितीत गटविकास अधिकारी अनिल बागल यांची भेट घेतली. लवकरच येथील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त वस्तू सेवा कर कार्यालयात अभिवादन
या प्रकरणी मेडद ग्रामस्थांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही निवेदन पाठवले. गटविकास अधिकारी अनिल बागल यांचीही भेट घेण्यात आली. निवेदनात नमूद केल्यानुसार, सध्या गावात पाणी पुरवठ्याचे कोणतेही नियोजन नाही.
पाणीपट्टी थकीत असल्याने ग्रामपंचायतीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे गावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही. ऐन हिवाळ्यात ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फेरावे लागण्याची वेळ आली आहे.
बारामतीत गायी चोरीचा गुन्हा उघड
One Comment on “बारामतीच्या ‘या’ गावावर पाणी संकट!”