बारामती, 9 जुलैः (प्रतिनिधी- अभिजीत कांबळे) बारामती शहरासह परिसरात ऐन पावसाळ्यात पाणी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील अनेक भागांना दिवसाआड पाणीपुरवठा करणार असल्याचे बारामती नगर परिषदेकडून फतवाच काढून सांगितले आहे. तर बारामती नगर परिषदेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या भागांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असंविधानिक?
निरा डावा कालव्यातील आवर्तन बंद झाल्याचे कारण देत नगरपरिषदेने शहरात ऐन पावसाळ्यात पाणी कपातीची मोहीम राबविली आहे. दरम्यान, वाढती लोकसंख्या लक्षात घेत शेकडो कोट्यावधी रुपये पाण्यासारखे खर्च करून बारामती शहरात मोठ्या क्षमतेचे पिण्याच्या पाण्याच्या साठवणुकीसाठी तलाव निर्मिती करण्यात आली. मात्र ऐन पावसाळ्यात त्या साठवण तलावाने तळ गाठत असल्याने अनेक प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
महसूल विभागाचा सावळा गोंधळ; ई-पिक पाहणी अॅप बंद?
शेकडो कोट्यावधी पैसे खर्चूनही बारामती नगर परिषदेच्या साठवण तलावात पाण्याचा तुटवडा कसा काय झाला? हेच का नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचे पाणी नियोजन? बानप मुख्याधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य नितीमुळे आज बारामतीकरांवर ऐन पावसाळ्यात पाण्याचे संकट ओढवले आहे.
One Comment on “ऐन पावसाळ्यात बारामतीवर पाणी संकट!”