बारामती, 14 जुलैः बारामती तालुक्यातील निरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वीर धरणात 7.76 टीएमसी झाली असून धरण 82.53 टक्के भरले आहे. तसेच वीर धरणाच्या पानलोट क्षेत्रात संततधार सुरु आहे. यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे.
येत्या 24 तासांत वीर धरणातून निरा नदीत विसर्ग सोडण्यात येऊ शकते. यामुळे संभव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने बारामती तालुक्यातील निरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत बारामतीच्या निरा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.
बारामतीत सराईत गुन्हेगाराला अटक; 1 पिस्टलसह २ जिवंत काडतूस जप्त