मुंबई, 12 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी आज (दि.12 जुलै) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. येत्या 48 तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, सबंधित जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
https://x.com/MahaDGIPR/status/1811677106193203406?s=19
https://x.com/RMC_Mumbai/status/1811667167559188655?s=19
या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी
त्यानुसार, हवामान विभागाने आजच्या दिवशी ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
https://x.com/ANI/status/1811599927069585539?s=19
मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस
मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत काल रात्रीपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले आहेत. रात्रभर पडलेल्या पावसामुळे नवी मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्याचबरोबर शहरात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तसेच मुंबईजवळील पालघरमध्ये ही आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबई, कोकण आणि पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे या शहरात पाणी साचून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देखील देण्यात आली होती. या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळित झाले होते.