लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी उद्या मतदान, सत्ताधारी आणि विरोधकांनी दिले उमेदवार

दिल्ली, 25 जून: (विश्वजीत खाटमोडे) भारताच्या 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी उद्या 26 जून रोजी सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. विशेष म्हणजे, लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी देशात पहिल्यांदाच मतदान होत आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर, लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांकडून ओम बिर्ला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर विरोधी पक्षाकडून के. सुरेश यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

https://x.com/ani_digital/status/1805499609977868780

https://x.com/ANI/status/1805488583345848798?s=19

ओम बिर्ला विरुद्ध के. सुरेश

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरचे लोकसभेचे हे पहिले अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच काल 280 खासदारांनी संसदेत शपथ घेतली. तर उर्वरित खासदार आज शपथ घेणार आहेत. त्यानंतर उद्या बुधवारी 26 रोजी सकाळी 11 वाजता लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएकडून भाजपचे ओम बिर्ला यांनी, तर इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे के. सुरेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे इतिहासात प्रथमच लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे.

https://x.com/AHindinews/status/1805477556487176424?s=19

राहुल गांधी काय म्हणाले?

यासंदर्भात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी प्रतिक्रिया दिली आहे. “मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला. राजनाथ सिंह यांनी खरगे यांच्याकडे त्यांच्या सभापतीसाठी पाठिंबा मागितला. यावेळी विरोधी पक्षांच्या वतीने त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आम्ही सभापतींना पाठिंबा देऊ पण विरोधकांना उपसभापतीपद मिळायला हवे. राजनाथ सिंह काल संध्याकाळी म्हणाले होते की, ते मल्लिकार्जुन खरगे यांना याबाबत पुन्हा कॉल परत करतील. परंतू त्यांचे आजपर्यंत कोणतेही उत्तर मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आलेले नाही, असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. तसेच विधायक सहकार्य हवे असे पंतप्रधान मोदी सांगत आहेत आणि मग आमच्या नेत्याचा अपमान केला जात आहे. त्यांचा हेतू स्पष्ट नाही. नरेंद्र मोदीजींना कोणतेही विधायक सहकार्य नको आहे. विरोधी पक्षाचा उपसभापती असावा, अशी परंपरा कायम राहिल्यास पूर्ण पाठिंबा देऊ, असे विरोधकांनी म्हटले आहे, असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *