फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

पंढरपूर, 23 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) कार्तिकी एकादशी निमित्त आज पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यंदा कार्तिकी एकादशीसाठी चार ते पाच लाख भाविक पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशीचा उत्साह पंढरपूर येथे दिसून येत आहे. यावेळी विठुरायाच्या नामजपाने संपूर्ण पंढरपूर परिसर दुमदुमून गेला आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. यावेळी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तसेच चंद्रभागेत स्नान करण्यासाठी देखील वारकरी मोठ्या संख्येने आलेले आहेत.

नरेंद्र मोदींना जीवे मरण्याची धमकी देणाऱ्याला अटक

दरम्यान, कार्तिकी एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. तसेच दरवर्षी उपमुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजा करण्यासाठी राज्यातील एका दाम्पत्याला मान मिळतो. यावेळी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माले दुमाला गावातील बबन विठोबा घुगे व वत्सला बबन घुगे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शासकीय महापूजेचा मान मिळाला.

आम्ही खोटे ठरलो तर फाशीची शिक्षा भोगायला तयार- रामदेव बाबा

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा मंदिर समितीचे उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान उपमुख्यमंत्र्यांसह शासकीय महापूजा करणाऱ्या दाम्पत्याला एक वर्षासाठी मोफत एसटी पास दिला जातो. त्यानूसार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घुगे दाम्पत्याला एका वर्षाचा मोफत एसटी पास देण्यात आला. तर राज्यात सध्या मराठा आरक्षणाची मागणी केली जात आहे. त्यामुळे राज्यात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा कार्तिकी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या घटली आहे.

One Comment on “फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *