विराट कोहलीचे 50 वे शतक; सचिनचा विक्रम मोडला

मुंबई, 15 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत न्यूझीलंडला 398 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 117 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 105 धावांची खेळी केली. तसेच शुभमन गिलने नाबाद 80 धावा केल्या. न्युझीलंड तर्फे टीम साऊदीने 3 आणि ट्रेंट बोल्टने 1 विकेट घेतली.

बस अपघातात 36 प्रवासी ठार; 19 जखमी

तत्पूर्वी, या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करीत 50 षटकांत 4 बाद 397 धावा केल्या. यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. यामध्ये रोहित शर्माचे योगदान सर्वाधिक होते. त्यावेळी रोहित शर्मा 29 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. रोहितने या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार लगावले. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी चांगली भागीदारी केली. या सामन्यात शुभमन गिलने नाबाद 80 धावा केल्या. मात्र तो मुंबईच्या उष्णतेमुळे रिटायर हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने चांगल्या गतीने धावा केल्या. यामध्ये श्रेयस अय्यरने अप्रतिम फटकेबाजी केली. या सामन्यात विराट कोहलीने वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक पूर्ण केले. याबाबतीत त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. विराट कोहली 113 चेंडूत 117 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. विराट बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने देखील आपले शतक झळकावले. श्रेयस अय्यरने 67 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात श्रेयसने 70 चेंडूत 105 धावा केल्या. तर केएल राहुलने 20 चेंडूत 39 धावांची खेळी केली.

मनोज जरांगे पाटील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

दरम्यान, या सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक झळकावले आहे. विराट कोहलीचे विश्वचषकातील हे 5 वे शतक आहे. त्याचबरोबर विराटने एका विश्वचषकात सर्वाधिक 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रमही केला आहे. त्याने 8 वेळा ही कामगिरी केली आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.

तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 पेक्षा अधिक धावांच्या बाबतीत विराट कोहली हा रिकी पाँटिंग सोबत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या दोघांनी 217 वेळा ही कामगिरी केली आहे. तर सचिन तेंडुलकरने 264 वेळा ही कामगिरी केली होती. याशिवाय, आजच्या सामन्यात विराट कोहलीने एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचा विक्रम मोडला आहे. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात 673 धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीच्या या विश्वचषकात 711 धावा झाल्या आहेत.

One Comment on “विराट कोहलीचे 50 वे शतक; सचिनचा विक्रम मोडला”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *