आफ्रिका दौरा अर्धवट टाकून विराट कोहली भारतात परतला

दिल्ली, 22 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. भारताला आता दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. यातील पहिल्या कसोटी सामन्याला 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. अशातच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून भारतात परतला आहे. त्याने कौटुंबिक कारणामुळे आफ्रिकेचा दौरा अर्धवट टाकला असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळणार आहे की नाही? याबाबत सध्यातरी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

https://twitter.com/ani_digital/status/1738121278949675287?s=19

मात्र एका मीडिया रिपोर्टनुसार, विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार असल्याचे म्हटले आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्धचा पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या आधी विराट कोहली भारतीय संघात परतेल, असे या मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे विराट कोहली दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार आहे की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



तत्पूर्वी, या कसोटी मालिकेच्या आधी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका विरुद्ध 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय मालिका खेळली. ज्यामध्ये टी-20 मालिका बरोबरीत सुटली आहे. तर ही एकदिवसीय मालिका भारताने 2-1 अशी जिंकली आहे. या दोन्ही मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. तर कसोटी मालिकेसाठी या खेळाडूंची निवड झाली आहे.



कसोटी मालिकेत निवड झालेला भारतीय संघ:-

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसीध कृष्णा आणि केएस भरत (यष्टीरक्षक).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *