बारामती, 12 मेः बारामती तालुक्यात अनेक खडी क्रेशर हे वन खात्याच्या हद्दीत जोमात सुरु आहेत. वन्य प्राणी अधिनियम नुसार, वन्य प्राण्याचे वास असणाऱ्या जागेपासून त्याचा दिनचर्या व्यत्यय येऊ नये, म्हणून वाहनांची आवक जावक पर्यावरणाला धोका पोहोचेल, असे धुळीचे कण, वाहनाचे आवाज, खडी क्रेशर किमान वन खात्याच्या विशिष्ट अंतरावर किमान 2 किलोमीटर ते 5 किलोमीटर अंतरावर असाव्यात.
परंतु बारामती तालुक्यातील पणदार खिंड, कऱ्हा वागज, पिपळी गाव आदींसह बारामती तालुक्यातील इतर भागात वन खात्याच्या जमीनींवर वन खाते आणि महसूल खात्याचे सर्व नियम धाब्यावर बसवून अशा प्रकारे गैण खनिजचा बेकायदेशीर व्यवसाय चालू आहेत. या बाबत बारामतीच्या वन अधिकाऱ्यांना विचारले असता, उडवा उडवीची उत्तर मिळाली.