हरियाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगाट यांचा विजय

जुलाना, 08 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी आज (दि.08) सकाळपासून सुरू झाली आहे. हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत भारताची महिला माजी कुस्तीपटू आणि काँग्रेस नेत्या विनेश फोगाट यांनी हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. विनेश फोगाट यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघात भाजपचे योगेश कुमार यांचा 6000 हून अधिक मतांनी पराभव केला. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विनेश फोगाट यांना एकूण 65 हजार 080 मते मिळाली. त्यामुळे विनेश फोगाट यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

https://x.com/ANI/status/1843573620142158145?t=GC7fx7leEq8r7NQJ8Qcoaw&s=19

https://x.com/BajrangPunia/status/1843550279301545985?t=mV6-qK4uLCrcvMOcZ5lcvA&s=19

बजरंग पुनिया यांनी केले अभिनंदन

विनेश फोगाट यांच्या विजयानंतर भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते माजी कुस्तीपटू आणि काँग्रेस नेते बजरंग पुनिया यांनी विनेश फोगाट यांचे सोशल मीडियावरून अभिनंदन केले आहे. “देशाची कन्या विनेश फोगाट हिच्या विजयासाठी खूप खूप अभिनंदन. ही लढत केवळ एका जुलाना जागेसाठी नव्हती, आणखी 3-4 उमेदवारांची नव्हती, केवळ पक्षांमधील लढत नव्हती. तर ही लढाई देशातील सर्वात बलाढ्य जुलमी शक्तींविरूद्ध होती आणि यामध्ये विनेश विजेती ठरली,” असे बजरंग पुनिया यांनी यामध्ये म्हटले आहे.

जुलानामध्ये तिरंगी लढत

दरम्यान, हरियाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातील ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरली. या निवडणुकीत जुलाना मतदारसंघात काँग्रेसकडून विनेश फोगाट, भाजपकडून योगेश कुमार आणि आपकडून डब्ल्यूडब्ल्यूई महिला रेसलर कविता राणी यांच्यात लढत होती. या निवडणुकीच्या मतमोजणीत विनेश फोगाट या अनेकवेळा पुढे मागे जात असल्याचे पहायला मिळाले. परंतु त्यांनी अखेर या निवडणुकीत विजय मिळवला. या निवडणुकीत विनेश फोगाट यांनी 6 हजार 015 मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत विनेश फोगाट यांना एकूण 65 हजार 080 मते मिळाली. भाजपचे उमेदवार योगेश कुमार यांना 59 हजार 065 मते आणि आपच्या कविता राणी यांना केवळ 1 हजार 280 मते मिळाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *