सांगवीमधील डॉक्टर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल; गुन्हा दाखल

बारामती, 12 सप्टेंबरः बारामती तालुक्यातील सांगवी गावात डॉ. युवराज गायकवाड यांचे साई क्लिनिक आणि राहते घर आहे. डॉ. युवराज गायकवाड यांना 6 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास काहीजणांकडून घरात घुसून मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर डॉ. युवराज गायकवाड यांनी 7 सप्टेंबर 2022 रोजी माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये 5 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नाराजीच्या बातम्यांना काहीही अर्थ नाही- अजित पवार

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, डॉ. युवराज गायकवाड हे त्यांच्या साई क्लिनिकमधील ओपीडी संपवून दरवाजा बंद करून कुटुंबासोबत रात्री 9.30 च्या सुमारास जेवण करीत होते. याचवेळी काहीजणांनी घराचा दरवाजा वाजवला. मात्र जेवण करत असल्याने दरवाजा उघडण्यास डॉ. युवराज गायकवाडांना दरवाजा उघडण्यास उशीर झाला. दरवाजा उघडताच रुग्णाला तपासण्यास उशीर केल्याचा राग मनात ठेवून डॉ. युवराज गायकवाड यांनी मारहाण केली. डॉ. युवराज यांनीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र संख्येने जास्त असल्याने त्यांना जबर मारहाण झाली. तसेच मारहाण होत असताना डॉ. युवराज गायकवाड यांचा मुलगा विराज गायकवाड हेही मध्ये पडले. मात्र त्यांनाही मारहाण करण्यात आली. सदर मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

या घटनेनंतर डॉ. युवराज गायकवाड यांनी माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेची तक्रार केली आहे. या तक्रारीवरून सांगवी येथील संशयित आरोपी आनंदा जगताप, विश्वजीत जगताप, भूषण जगताप, राजेंद्र जगताप, अशोक जगताप यांच्यावर भादवी 324, 323, 452, 143,147, 148 ,149, 427 ,504 ,506 सह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान) यांना प्रतिबंध अधिनियम 2010 कलम 04 व 06 यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक रुपाली धिवार, पोलीस हवलदार संजय मोहिते करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *