ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

मुंबई, 26 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले आहे. त्यांचे आज (दि.26) पहाटेच्या सुमारास निधन झाले. त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण वारकरी समाजावर शोककळा पसरली आहे. तर काही महिन्यांपूर्वीच बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर यांचे निधन झाले होते.

मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या

दरम्यान, बाबा महाराज सातारकर हे एक प्रख्यात कीर्तनकार होते. त्यांचे अनेक ठिकाणी कीर्तन आणि प्रवचनाचे कार्यक्रम झाले होते. त्यांनी त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपले विचार लोकांपुढे पोहचवण्याचे काम केले आहे. बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला होता. तेंव्हा त्यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा होती. बाबा महाराज सातारकर यांनी लहानपणापासूनच कीर्तनात अभंगाच्या चाली म्हणण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी कीर्तनाची ही परंपरा पुढे सुरू ठेवली. तत्पूर्वी, बाबा महाराज सातारकर यांनी मुंबईतील नेरुळ येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या (दि.27) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मोदी आज शिर्डीच्या दौऱ्यावर! अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करणार

बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाची बातमी कळताच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “किर्तनकलेचा खऱ्या अर्थाने परिपूर्ण आविष्कार, असंख्य भाविकभक्तांचे श्रद्धास्थान, भागवत धर्माचा वैश्विक राजदूत आणि आधुनिक काळातील माउली महावैष्णव तसेच वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची अपरिमित हानी झाली आहे. परमेश्वर श्री बाबा महाराज सातारकर यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि भाविकभक्तगणांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.” असे मुख्यमंत्री शिंदे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

One Comment on “ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *