महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बारामतीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

बारामती, 12 एप्रिल: क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त शिव फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने बारामती शहरातील अनंत आशा नगर येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होलार समाज मंदिर याठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रतिमेला शिव-फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.



क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बारामती शहरातील अनंत आशा नगर येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होलार समाज मंदिर येथे शिव-फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने व हिंद लॅब बारामती यांच्या सौजन्याने रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच याठिकाणी पुणे संचलित मोफत मोतीबिंदु निदान व नेत्रतपासणी शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी या उपक्रमास भेट दिली. शिव फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे हे प्रथम वर्ष असून प्रतिष्ठानने प्रथम वर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी केली आहे.



याशिवाय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिव-फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने बारामती मधील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना आज फळे वाटप करण्यात आले आहे. तसेच बारामती शहरात शनिवार दि. 13 एप्रिल रोजी अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. तर रविवार दि. 14 एप्रिल रोजी नागरिकांना लाडूचे वाटप करण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती शिव-फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंटी नाना गायकवाड यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *