बारामती, 9 फेब्रुवारीः बारामती येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे 7 फेब्रुवारी 2023 पासून प्रबुद्ध युवक संघटना यांच्यावतीने विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलनाला विविध संघटना आणि पक्षांनी पाठिंबा दर्शविल्याची माहिती ‘भारतीय नायक’च्या वार्ताहाराला सांगण्यात आले आहे.
सदर आंदोलना भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष अमोल राज प्रभुणे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. सदर बाब ही गंभीर असून मंत्री महोदय यांना कळवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे जिल्हा सचिव सुनील शिंदे आणि तालुकाध्यक्ष संजय वाघमारे यांनी सदर आंदोलनाला भेट दिली. यासह भवानी माता चे संपादक लक्ष्मण भिसे यांनी आंदोलनाला भेट दिली.
बारामतीत पत्रकार हल्ला प्रकरणी कठोर कारवाईची मागणी
बारामती शहरासह तालुक्यात क्षमतेपेक्षा जास्त ट्रॅक्टर व ट्रक ऊस वाहतूक कारणामुळे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे कित्येक जण मृत्युमुखी पडले आहेत, याची परिवहन खाते दखल घेत नाही, याची खंत वाटते, असे या भेटी दरम्यान, सुनिल शिंदे आणि संजय वाघमारे यांनी सांगितले. तसेच या संदर्भात केंद्रीय राज्य सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याशी पत्रव्यवहार आणि चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर बाब अत्यंत गंभीर असल्याने उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह त्यांनी चर्चा केल्याचे सांगितले. यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे प्रबुद्ध युवा संघटनेच्या आंदोलनाला पाठिंब्याचे पत्र दिले असल्याचे ‘भारतीय नायक’च्या वर्तहाराशी बोलताना सांगितले.
बारामतीत संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
यासह आरपीआयकडून सदर आंदोलनकर्ते ओंकार माने यासह प्रबुद्ध युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सम्राट गायकवाड, अध्यक्ष अभिजीत कांबळे, सुशिल कांबळे, गणेश जाधव, आशिष भोसले यांना जाहीर पाठिंबा असल्याचे घोषित केले.
प्रबुद्ध युवा संघटना मातंग आघाडी अध्यक्ष राहुल खरात यांनी सदर आंदोलनाच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर आरटीओ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
One Comment on “प्रबुद्ध युवा संघटनेच्या आंदोलनाला विविध पक्षांचा जाहीर पाठिंबा”